तू
तुच साय्रा जगात अन् तुच माझ्या मनात आहे।
तुच आहे सादेत माझ्या, तुच हर क्षणात आहे।
निळेभोर आकाश तुच, तु नदीचा खळाळ आहे,
फुलांचा सुगंध तुच, तुच पानापनात आहे।
इंद्रधनुचे रंग तुच, तु कडाडती वीज आहे,
तुच काळ्या ढगांत अन् तुच थेंबाथेंबात आहे।
लेखणीही तुच माझी, तुच माझा शब्द आहे,
तुच माझे काव्य अन् तुच शायरीत आहे।
तु नाही कोणीपरी, तु नाही विश्वसुंदरी,
तुच पण प्रेयसी माझी, तुच माझ्या ह्र्द्यात आहे।

2 Comments:
wah wah!!i will cut pest this to my girlfriend's :D
आणि ह्र्द्याच्य़ा भावना कागदावर उतरल्य़ास.तूच माझ्य़ा कवितेत आहेस.
Post a Comment
<< Home