Saturday, September 23, 2006

मदहोश

पिऊनी मद सारा तुझा हा, आज मी मदहोश झालो
ओतुनी ही जान तुझ्यावर, आज मी बेजान झालो


ओठ गुलाबी रसाळलेले तुझे ते मज याद आहेत,
डुंबुनी त्या रसगंधात, आज मी ही रसाळ झालो ।

ठार ज्याने लोक झाले, ते तुझेच नयनबाण होते,
मुर्ख तयांना म्हणता म्हणता, मीच तुझा ग शिकार झालो ।

देवा तुझी देवक्रुपा, आहे माझ्यावरी अनंत,
स्वत:हूनी अवक्रुपेस तुझ्या, आज मी रे पात्र झालो ।

केलेत कैक पाप मी, गणती जयांची नाही,
न्हाउनी तव प्रेमरसात, आज मी ही पाक झालो ।

कर्मयोगी नाव ज्याचे, कामाचा मी माणुस होतो,
गुंतूनी तव प्रेमपाशी, आज मी बेकाम झालो ।

आज साय्रा जगात, मी भणंग आहे,
दगड-गोटयाहूनी बघ, आज मी नगण्य झालो ।

ताल-सुर प्राण माझे, आहे साय्रा जगतास द्यात,
साथीवाचुन तुझ्या सखे ग, आज मी बेसूर झालो ।

कैफ़ चढतो यशाचा, गोष्ट नवी ही नाही,
जिंकताच आज तुजला, बघ कसा मी बेभान झालो ।

निराकार-निर्गुण, म्हणती या जगती तयाला,
गीत तयावर लिहीता म्हणाला, बघ कसा मी साकार झालो ।

कळे ना काळे अक्शर, काय कागदावरी उमटले,
गुण तुझे गाता गाता, आज मी ही शायर झालो ।